ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांना ‘सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र’ पुरस्कार प्रदान !
मुंबई – ‘साहित्य आभा वर्ष २०२३’ या लोकप्रिय दिवाळी अंकामध्ये ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांनी रेखाटलेल्या आगळ्या हास्यचित्रांची पारितोषिकासाठी अन्य व्यंगचित्रांच्या स्पर्धेमधून निवड झाली. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांनी घेतलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पुरस्कार सोहळा मुंबई येथे २० जुलै या दिवशी पार पडला. तेव्हा ‘सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र’ पुरस्कार विवेक मेहेत्रे यांना प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रासाठीचा पुरस्कार गेल्या ४४ वर्षांमध्ये, विविध संस्थांच्या स्पर्धांमध्ये यापूर्वी श्री. विवेक मेहेत्रे यांना ९ वेळा प्राप्त झालेला आहे.