पालघर येथील आश्रमशाळेत विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले !

प्रतिकात्मक चित्र

पालघर – जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देहरे (किरमिरा) या आश्रमशाळेतील १७ वर्षीय पायल या युवतीने स्वतःला पेटवून आत्महत्या केली आहे. देहरे आश्रमशाळेत ११ वीमध्ये शिकणार्‍या पायलने दुपारच्या वेळी आश्रमशाळेच्या तिसर्‍या मजल्यावर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. ही घटना समजल्यानंतर आश्रमशाळेतील शिक्षकाने तिला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले; मात्र ती ९० टक्के भाजली होती. रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजले नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र या घटनेची चर्चा होत आहे.