स्वामी विवेकानंद यांची शिकवण
१. जीवात्म्याचे निवासस्थान असलेले, हे शरीर कर्म करण्याचे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे आणि जो माणूस, हे शरीर नरकतुल्य करतो, तो अपराधी आहे, तसेच जो माणूस शरिराची हेळसांड करतो, त्याची उपेक्षा करतो, तोही दोषास पात्र आहे.
२. सिद्धी, चमत्कार इत्यादींसारख्या गूढ, रहस्यमय गोष्टींच्या पाठीमागे लागू नका, त्यांना मुळीच स्पर्श करू नका.
३. एखादा मनुष्य राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवू शकेल; पण तो जर आपल्या वासना आणि विकार यांचा गुलाम असेल, तर खर्या स्वातंत्र्याच्या शुद्ध आनंदाचा त्याला कधीही अनुभव येणार नाही.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)