रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाविषयी उद्योजक आणि धर्मप्रेमी यांना जाणवलेली सूत्रे
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिरात सहभागी झालेले उद्योजक श्री. आबासाहेब धायगुडे आणि धर्मप्रेमी श्री. संजय निमकंडे यांना सनातनच्या आश्रमाविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. उद्योजक श्री. आबासाहेब काशीनाथ धायगुडे, पुणे
अ. ‘रामनाथी आश्रमातील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहून मला प्रसन्न वाटले.
आ. आश्रमातील साधकांकडे पाहिल्यावर त्यांच्यात ‘दैवी गुण आहेत’, असे माझ्या लक्षात आले. त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये अतिशय नम्रता आणि आपलेपणा जाणवला.
इ. आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करतांना मी ‘दैवी प्रसाद ग्रहण करत आहे’, अशी मला प्रचीती येत होती.
ई. ‘मी आश्रमात आल्यापासून मला चैतन्य लहरींची अनुभूती येत होती.’
२. धर्मप्रेमी श्री. संजय निमकंडे, अकोला
अ. मी आश्रमामध्ये प्रवेश केल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये ‘गुरुमाऊली आपली पदोपदी काळजी घेत आहे’, असे मला जाणवले.
आ. ध्यानमंदिरामधील गुरुपरंपरा दर्शवणारी छायाचित्रे आणि देवतांची चित्रे यांचे दर्शन घेतल्यावर मी धन्य झालो.
इ. ‘आश्रमातील प्रत्येक वस्तू माझ्याशी बोलत आहे’, असे मला जाणवले.
ई. ‘आश्रमात प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे ‘हिंदु राष्ट्र’ प्रत्यक्ष अवतरले आहे’, असे मला पदोपदी जाणवत होते.’
– सर्व सूत्रांचा दिनांक (१९.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |