Terminates J&K Govt Employees : जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य करणारे जम्मू-काश्मीरचे ४ मुसलमान सरकारी कर्मचारी बडतर्फ !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांसाठी शस्त्रास्त्रे अन् पैसे गोळा करणे, तसेच पाकिस्तानी तस्करांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अमली पदार्थांचे वितरण करणार्या ४ मुसलमान सरकारी कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. यातील २ जण पोलीस, एक शिक्षण विभागाचा कर्मचारी आणि एक पंचायती राज कर्मचारी आहे. इम्तियाज अहमद लोन, बाजील अहमद मीर, मुश्ताक अहमद पीर आणि जैद शाह अशी त्यांची नावे आहेत.
सुरक्षायंत्रणांना या चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या होत्या आणि ते त्यांच्याविरुद्ध चौकशी करत होते. नोकरीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. हे कर्मचारी पाकिस्तानमार्गे येणारे अमली पदार्थ काश्मीरमध्ये विकायचे आणि त्यातून मिळालेला पैसा आतंकवादासाठी वापरायचे.
आतापर्यंत ५५ कर्मचार्यांवर कारवाई
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारने आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या किमान ५५ कर्मचार्यांवर कारवाई केली आहे. अशा कर्मचार्यांची ओळख पटवण्यासाठी सरकारने एक कृती दलही स्थापन केले आहे.
संपादकीय भूमिका
|