Nepal Plane Crash : नेपाळच्या काठमांडू विमानतळावर विमान कोसळून १८ जणांचा मृत्यू
काठमांडू (नेपाळ) – येथील विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर काही क्षणातच विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, तर एक जण घायाळ झाला. या विमानात १९ प्रवासी होते. हे विमान ‘सौर्य एअरलाईन्स’चे होते. यातील सर्व प्रवासी याच एअरलाईन्सचे कर्मचारी होते. हे विमान काठमांडूवरून पोखरा येथे जातांना हा अपघात घडला. विशेष म्हणजे या विमानाचा वैमानिक जिवंत असून त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.