धारावीच्या पुनर्विकासाला विरोध या उद्धव ठाकरे यांच्या ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ! – संजय निरुपम
मुंबई – विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर धारावीच्या पुनर्वसनाला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे की, त्यांनी अदानींकडून निधी घेतला नाही, असे परखड प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, वर्ष २०१९ मध्ये धारावी पुनर्विकासाच्या संदर्भातील अदानी यांची निविदा मागे पडून काही तांत्रिक अडचणींमुळे ‘सेकलिंक’ आस्थापनाने यातून माघार घेतली होती. वर्ष २०२० मध्ये ठाकरे सरकारने ‘सेकलिंक’ची निविदा रहित केली होती आणि अदानी यांना वाट मोकळी करून दिली होती. हा निर्णय त्यांनी कुणाच्या दबावाखाली घेतला होता ? पवार आणि अदानी यांचे सलोख्याचे संबंध पूर्ण भारताला ठाऊक आहेत. महायुती शासनाने पूर्वीचाच मसुदा कायम ठेवला आहे. मग त्याला विरोध का होत आहे ?