अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
मध्यमवर्गाला लाभ देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. युवा, गरीब आणि शेतकर्यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे. सामाजिक कल्याणच्या विकासाचा दर महागाई दरापेक्षा अधिक आहे. आरोग्य क्षेत्रातील खर्च दुप्पट झाला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट केली आहे. मोठी गुंतवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे. केवळ ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्यासाठी (खोटी कथानके सांगण्यासाठी) त्याला विरोध करून राजकारण करू नका.
केंद्राचे नवरत्न बजेट ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
कररचनेत मोठे पालट करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला हा नवरत्न अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध ९ घटकांवर लक्ष केंद्रित करणारा आहे. ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा आहे.