Bangladesh Violence : बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंवर आक्रमण !
|
नवी देहली – बांगलादेशमध्ये आरक्षणावरून गेले काही दिवस हिंसाचार झाला. आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ७ टक्क्यांवर आणल्याने आंदोलनकर्त्यांचा विजय झाला आहे. या हिंसाचाराच्या वेळेचा एक व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित करण्यात आला आहे. यात या हिंसाचाराच्या माध्यमातून हिंदूंची घरे जाळण्यात आल्याचे यात दिसून येत आहे. जितेंद्र प्रताप सिंह नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
१. जितेंद्र सिंह यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आंदोलक ध्वनीक्षेपकावरून बोलत आहेत, ‘भारत जाडर मामर बारी, बांगला छरो तारी’ म्हणजेच ज्यांच्या मामाचे घर भारत आहे त्यांनी लवकर बांगलादेश सोडावे.’
२. बांगलादेशात या हिंसाचाराच्या आडून अनेक हिंदूंची घरे जाळली जात आहेत, त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत आणि संपूर्ण बांगलादेशात भारतविरोधी वातावरण निर्माण केले जात आहे.
३. बांगलादेशातील हिंसाचारामुळे ४ सहस्र ५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ११५ हून अधिक लोक मारले गेले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक अधिकार्यांच्या सतत संपर्कात आहे.
#BangladeshViolence : ‘जिनके मामा का घर भारत है, वे तुरंत #Bangladesh छोड दें’, ऐसी धमकियां दी जा रही हैं !
पढ़े विस्तृत –https://t.co/kDOR0gquC2 #SheikhHasina हिन्दुओं की रक्षा हेतु पहले भी कुछ नहीं करती थीं एवं अब भी उन्होंने कुछ किया नहीं है । आगे जाकर भी वे कुछ करेगी, ऐसी…
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 24, 2024
संपादकीय भूमिका
|