ज्योती देवरे यांची खेडच्या तहसीलदारपदी नियुक्ती
पुणे – जिल्हा गौणखनिज भरारी पथक प्रमुख पदावर कार्यरत असतांना वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार तथा वडीवळे प्रकल्पाच्या साहाय्यक पुनर्वसन अधिकारी ज्योती देवरे यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. त्यांची खेड तालुक्याच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीचे आदेश सहसचिव अजित देशमुख यांनी काढले आहेत.