पनवेल येथे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !
पनवेल – येथे तीन ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
१. नवीन पनवेल येथील श्री बँक्वेट्स हॉल येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. ‘मावळ्यांनी सर्वस्वाचा त्याग करून मिळवलेल्या गड-दुर्गांवर सध्या गड जिहाद चालू आहे. हा जिहाद उखडून टाकण्यासाठी आपण विशाळगडमुक्तीच्या आंदोलनात वेगवेगळ्या माध्यमातून सहभागी झाले पाहिजे आणि हे षड्यंत्र उखडून टाकले पाहिजे’, असे श्री. संजय पाटील म्हणाले.
या वेळी मागील ३ वर्षांपासून श्री बँक्वेट्स सभागृह गुरुपौर्णिमेसाठी विनामूल्य देणारे व्यावसायिक श्री. कुंजलाल खोसला आणि मागील ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरत करणारे श्री. विलास सुर्वे (वय ७० वर्षे) यांचा सत्कार करण्यात आला.
२. खांदा वसाहतीतील सोहळ्यात हिंदुत्वनिष्ठ कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त जोशी यांनी मार्गदर्शन करतांना राष्ट्र-धर्म म्हणजे काय, राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती आपली कर्तव्ये कोणती आणि त्यांचे पालन कसे करावे, यावर मार्गदर्शन केले. ‘भ्रष्टाचाराविरोधी सतर्कता असणे, दैनंदिन जीवनात वावरतांना स्वच्छतेप्रती सतर्क असणे आणि इतरांना सतर्क करणे इत्यादी छोटे छोटे प्रयत्न करूनही आपण राष्ट्र आणि धर्मासाठी प्रतिदिन आपले कर्तव्यपालन करू शकतो’, असे सांगितले.
दैनिक ‘सनातन प्रभात’ वृत्तपत्राच्या वितरणाची सेवा करणारे येथील वितरक श्री. मारुती शिंत्रे यांचा सत्कार ह.भ.प. चारुदत्त जोशी यांच्या हस्ते करण्यात आला, तर इयत्ता १२ वीमध्ये ८८ टक्के मिळवून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी श्री. हर्षवर्धन गांधी याचा सत्कार सनातन संस्थेचे वक्ते श्री. श्रीकृष्ण उपाध्ये यांनी केला.
३. नवीन सुधागड शाळा, कळंबोली येथे आयोजित गुरुपौर्णिला गुढीपाडवा सांस्कृतिक उत्सव समिती, कळंबोलीचे खजिनदार श्री. विजय सावंत, दक्षिणमुखी हनुमान मंदिर कळंबोलीचे अध्यक्ष श्री. वसंत म्हात्रे, ‘गौरव क्लासेस’चे संचालक श्री. संतोष वर्तक आणि सिंधुदुर्ग रहिवासी संघ कळंबोलीचे अध्यक्ष श्री. विष्णु धरे आदी मान्यवर उपस्थित होते.