कोल्हापूर शहरातील गुरुपौर्णिमेसाठी ६०० जणांची उपस्थिती !

देव, देश, धर्म यांसाठी आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे ! – सुनील सामंत, संस्थापक अध्यक्ष, शिवशाही फाऊंडेशन

सुनील सामंत, संस्थापक अध्यक्ष, शिवशाही फाऊंडेशन

कोल्हापूर – महाराष्ट्रातील प्रत्येक गड-दुर्गांवरील अतिक्रमण हे निघालेच पाहिजे आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लोक आंदोलन करत आहेत. त्यातीलच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या ठिकाणीही विधर्मींचे (हिंदूसोडून अन्य, येथे मुसलमान) मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण निघण्यासाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आणि अखेर शासनाला ते अतिक्रमण काढावे लागले. या वेळी हिंदूंचा उद्रेक झाला, ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. सध्याच्या काळात अनेक ठिकाणी विधर्मियांकडून हिंदु धर्म असुरक्षित करण्याचे काम चालू आहे. असे असले तरी आध्यात्मिक शक्तीमुळे हिंदु धर्म सुरक्षित आहे, तरी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण देव, देश, धर्म यांसाठी सतत कार्यरत रहाण्याचा संकल्प करूया, असे मार्गदर्शन ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील सामंत यांनी केले. ते सनातन संस्थेच्या वतीने राजारामपुरी येथील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.

या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’, या विषयावर जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी सनातन संस्थेच्या संत डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी ६०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर 

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. रघुनाथ टिपुगडे, हुपरी येथील चांदी व्यावसायिक श्री. शिवाजीराव शेटगे, व्यावसायिक श्री. राहुल पोतदार, मलकापूर येथील व्यावसायिक श्री. रमेश पडवळ, नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, उद्योजक श्री. जयंत पाटील, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, ‘सनातन सत्पंथ प्रेरणापीठ कर्णावती’चे संपर्कप्रमुख श्री. घन:शामभाई पटेल, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ‘पतंजलि योग समिती’चे श्री. सुब्रमण्यम शर्मा, हिंदुत्वनिष्ठ श्री. अभिजित पाटील, श्री. कमलाकर किलकिले, ‘तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय’चे (नवे पारगाव)  प्राचार्य डॉ. हरिश कुलकर्णी, उद्योजक श्री. हसमुखभाई शहा, श्री. पुरुषोत्तम पटेल.

हिंदुविरोधी, राष्ट्रविरोधी ‘नॅरेटिव्हज्’ (कथानके) हाणून पाडण्याची आणि धर्मनिष्ठ अन् राष्ट्रनिष्ठ तेजस्वी विचार समाजात रुजवण्याची आवश्यकता ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज आपण पहातो की, सनातन धर्म संपवण्याच्या वल्गना उघडपणे केल्या जातात. ‘सनातन धर्म ही कीड आहे, कुष्ठरोग आहे’, अशी जाहीर विधाने केली जातात आणि कुणाच्याही विरोधात काहीही कारवाई होत नाही. पुरो(अधो)गामी, साम्यवादी, ‘अर्बन (शहरी) नक्षलवादी’ अशा वेळी गप्प असतात. ‘सर तन से जुदा’, ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा दिल्या, तरी ते गप्प असतात. हेच लोक गाझापट्टीतील सक्रीय आतंकवादी संघटना ‘हमास’च्या समर्थनार्थ मोर्चे काढतात. ‘श्रीरामजन्मभूमीवर मंदिर नव्हे, तर रुग्णालय बांधा, असा सल्ला देतात आणि दुसरीकडे ‘वन्दे मातरम्’चा आग्रह धरला, तर मात्र कट्टरता आणि असहिष्णुता वाढल्याचा कांगावा करतात, तसेच हिंदुत्वनिष्ठ अन् राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना, संस्थांना आरोपींच्या पिंजर्‍यात उभे करतात. या टोळ्यांकडून काही हिंदुविरोधी, राष्ट्रविरोधी ‘नॅरेटिव्हज्’ (कथानक) प्रस्थापित केली जातात, ती हाणून पाडण्याची आणि धर्मनिष्ठ अन् राष्ट्रनिष्ठ तेजस्वी विचार समाजात रुजवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

हिंदूंनी ‘हलाल’ शिक्का असलेली उत्पादने खरेदी करू नयेत ! – सागर कुराडे, तालुका कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 

गडहिंग्लज येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना श्री. सागर कुराडे

गडहिंग्लज – सध्या वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद चालू असून भूमी जिहाद, गड जिहाद, ‘लव्ह जिहाद’ या माध्यमांतून हिंदु धर्मावर आक्रमण केले जात आहे. यावर उपाय म्हणजे हिंदूंमधील धर्माभिमान वाढण्यासाठी त्यांना धर्माचे शिक्षण देणे आवश्यक आहे. आपण जेव्हा कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जातो, तेव्हा ‘हलाल’ शिक्का असलेली उत्पादने खरेदी करता कामा नयेत. आता हिंदूंसाठी ‘ओम’चा शिक्का असलेली उत्पादने उपलब्ध करून हिंदूंनी ती खरेदी करण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे तालुका कार्यवाह श्री. सागर कुराडे यांनी केले. या सोहळ्यासाठी ५२५ जिज्ञासू उपस्थित होते.

देश स्वतंत्र झाला; मात्र हिंदूंना अपेक्षित असे धार्मिक स्वातंत्र्य मिळाले नाही ! – किरण कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ

निपाणी (कर्नाटक) – रामकृष्ण परमहंस यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वामी विवेकानंद यांनी जे काही हिंदु धर्मासाठी कार्य केले, ते आजही आपणा सर्वांसाठी आदर्श आहे. तेच कार्य पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनीही केले. भारताला असलेली गुरु-शिष्य परंपरा आपल्यासाठी आदर्श आहे. देश स्वतंत्र झाला; मात्र हिंदूंना जे अपेक्षित असे धार्मिक स्वातंत्र्य मिळायला हवे, ते अद्यापही मिळालेले नाही. बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. कोणतेही सरकार आले, तरी हिंदूंवरील अन्याय अल्प होत नाही. त्यासाठी आपल्यालाच आता संघटित होऊन कृतीशील व्हावे लागेल, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी यांनी केले. ते गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. या सोहळ्यासाठी ४०० जिज्ञासू उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती असूनही, तसेच गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळेत पाऊस असूनही अनेक जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ कोल्हापूर शहर आणि गडहिंग्लज येथील सोहळ्यासाठीही उपस्थित होते. आजूबाजूच्या काही गावांमधील धर्मप्रेमी हे पाणी वाढल्यामुळे रस्ता बंद झाल्याने येऊ शकले नाहीत.

कोल्हापूर शहर येथील गुरुपौर्णिमा

 

गडहिंग्लज येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात उपस्थित जिज्ञासू, मान्यवर
गडहिंग्लज येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात उपस्थित जिज्ञासू, मान्यवर
निपाणी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात उपस्थित जिज्ञासू, मान्यवर
निपाणी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रदर्शन पहातांना जिज्ञासू
कोल्हापूर शहर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रदर्शन पहातांना जिज्ञासू