Bangladesh Supreme Court : बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणली !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण देण्याच्या टक्केवारीत घट करणारा आदेश दिला आहे. न्यायालयाने ५६ टक्के असणारे आरक्षण आता केवळ ७ टक्के केले आहे.
Bangladesh Supreme Court scraps most quotas; veterans’ quota be cut to 5 percent, 93 percent of jobs to be allocated on merit !
Urges student protesters to return to class.
The prior decision of Bangladesh’s High Court led to nation wide clashes and the death of at least 133… pic.twitter.com/eEMocQ1v64
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2024
यात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना ५ टक्के, तर उर्वरित २ टक्के आरक्षण अल्पसंख्यांक, तृतीयपंथी आणि अपंग यांना देण्यात आले आहे. ‘९३ टक्के नोकर्या गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातील’, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधातील आंदोलन हिंसक झाल्याने ११५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सैन्याला तैनात करण्यात आले आहे.