‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी मिळतील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
नगर – राज्यशासनाने चालू केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १ सहस्र ५०० रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट या दिवशी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार केला आहे. त्या दिवशी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३ सहस्र रुपये जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे झालेल्या सभेत बोलतांना केले.