छल्लेवाडा (चंद्रपूर) येथील अंगणात झोपली असता पेटवून दिलेली व्यक्ती अखेर मृत !
चंद्रपूर – घरासमोरील अंगणात झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर १ जूनच्या मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना २ जून या दिवशी अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा या गावात घडली होती. चरणदास गजानन चांदेकर (वय ४८ वर्षे) असे या जळलेल्या व्यक्तीचे नाव होते. गेल्या ५० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. २० जुलै या दिवशी अखेर ही व्यक्ती मृत पावली आहे. मागील ५० दिवस खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून त्यांच्या मुलाने त्यांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते.