ऋण हे फेडू कसे माऊलीचे ।

‘गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर १.७.२०२३ पासून काही काव्ये प्रतिदिन सुचायची आणि ती सुचल्यानंतर माझी भावजागृती व्हायची. तेव्हा ‘मी गुरूंची स्तुती करते; पण गुरु मलाच आनंद देतात’, असे मला वाटायचे. ती काव्यरूप कृतज्ञतापुष्पे पुढे दिली आहेत.

१.७.२०२३ या दिवशी सुचलेले काव्य

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ऋण हे फेडू कसे माऊलीचे ।
प्रत्येक क्षणी मी होत आहे ऋणी तयांची ।। १ ।।

कु. रजनीगंधा कुर्‍हे

मातेपेक्षाही वात्सल्य अधिक त्यांचे ।
पित्यापेक्षाही घेती अधिक काळजी सगळ्यांची ।। २ ।।

प्रत्येक क्षणी संरक्षण लाभे सूक्ष्मातून गुरूंचे ।
ऐसा जगी कोण आहे जो देई प्रेम सगळ्यांचे ।। ३ ।।

चुकले जरी अनेकदा मी गुरु जवळी घेती कित्येकदा ।
अंतर्मुख होण्या मी गुरु तळमळे माझ्याहून अनेकदा ।। ४ ।।

गुरुपौर्णिमेस अर्पण तरी काय करावे हा प्रश्न आहे ।
कारण गुरुमाऊली माझी कृतज्ञतेपलीकडे आहे ।। ५ ।।

शरण गेले जरी त्यांच्या चरणी ।
तरी शरणागती ही त्यांचीच देणगी आहे ।। ६ ।।

या ऋणातच ठेव माऊली ।
जेणेकरून माझा अहंही तुझ्याच ऋणात राही ।। ७ ।।    (क्रमश:)

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक