एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे हे पाप, तर ती ऐकणे महापाप !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
ही जाणीव असू द्या की, एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. हे पाप कधीही करू नका. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल.
आपल्या एखाद्या बांधवाची निंदा करण्यासाठी कुणी तुमच्याकडे आला, तर तुम्ही त्याचे बोलणे मुळीच ऐकू नका. अशा गोष्टी ऐकणे, हेही महापाप आहे. त्यातच पुढे होणार्या गडबडीचे बीज विद्यमान असते.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)