३ वर्षांपासून बेपत्ता असणार्या ७ वर्षांच्या हिंदु मुलीच्या शोधासाठी पालकांची कराचीमध्ये निदर्शने
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून बेपत्ता झालेल्या हिंदु मुलीच्या पालकांनी तिला शोधून परत आणण्याच्या मागणीसाठी कराचीमध्ये निदर्शने केली. ७ वर्षांची प्रिया कुमारी १९ ऑगस्ट २०२१ या दिवशी पाकिस्तानमधील दक्षिण सिंध प्रांतातील सुक्कूरजवळील संगार येथे तिच्या घराजवळ मोहरम आशुरा मिरवणुकीत सरबत वाटत असतांना बेपत्ता झाली. तिचा शोध घेऊन कंटाळून तिचे वडील राज कुमार पाल आणि आई वीणा कुमारी यांनी कराचीच्या क्लिफ्टन भागातील प्रसिद्ध ३ तलवार या ठिकाणी निदर्शने केली. त्यांचा उद्देश लोकांना आठवण करून देण्याचा होता की, त्यांची मुलगी अद्याप सापडलेली नाही.
Parents protest in #Karachi to search for a 7 year-old Hindu girl who has been missing for 3 years
This is the situation of Hindu daughters in #Pakistan. It is the misfortune of the Hindus that no one raises their voice about this !
In Pakistan, since there are no progressive,… pic.twitter.com/gSp7yNbqoN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 21, 2024
वडील राज कुमार पाल म्हणाले की, आम्हाला पुन्हा आश्वासन देण्यात आले आहे की, ते आमच्या मुलीचा शोध घेत असून लवकरच तिचा शोध घेण्यात येईल. या आश्वासनानंतर निदर्शने मागे घेण्यात आली.
संपादकीय भूमिका
|