प.पू. डॉ. आठवले यांच्या गुरूंप्रतीच्या अनन्य भावामुळे त्यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट !
प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील देवघरामध्ये वर्ष २०१० मध्ये त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पूजेसाठी ठेवले. त्यानंतर गेल्या १४ वर्षांत प.पू. डॉक्टर यांच्या गुरूंप्रतीच्या अनन्य भावामुळे या छायाचित्रामध्ये प्रतिवर्षी काही प्रमाणात पालट होत गेले. वर्ष २०२४ मधील छायाचित्रामध्ये स्थुलातून झालेले पुढील पालट लक्षात येतात.
१. प.पू. भक्तराज महाराज यांच्या डोक्यामागील प्रभावळीचा आकार वाढला आहे.
२. चेहरा, हात आणि काठी पिवळसर झाले आहेत.
आध्यात्मिक कारणांमुळे झालेले पालट जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे यातील काही वर्षांच्या छायाचित्रांचे संशोधन करण्यात आले. ‘यू.ए.एस्.’ उपकरण आणि लोलक यांचा उपयोग करून वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. या संशोधनातून लक्षात आले की, वर्ष २०२० मध्ये या छायाचित्रामध्ये सकारात्मक ऊर्जा १५.१७ मीटर होती, तर ती वर्ष २०२४ मध्ये वाढून ४४ सहस्र २०० मीटर झाली.
निष्कर्ष
प.पू. डॉ. आठवले यांचा त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती अनन्य भाव आहे. प.पू. डॉ. आठवले यांच्या उच्चतम भावामुळे देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पुष्कळ जागृत झाले आहे आणि ‘प.पू. भक्तराज महाराज तेथे प्रत्यक्ष आहेत’, असे वाटते. ‘या छायाचित्रामध्ये भाव आणि चैतन्य हे सगुण स्तराचे घटक सर्वाधिक प्रमाणात आहेत’, असे जाणवले. देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रामधील सगुण स्पंदनांचे प्रमाण ९० टक्के असल्याचे जाणवले.
‘प.पू. डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान समष्टी कार्यात त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे विशेष कृपाशीर्वाद त्यांना लाभत आहेत’, असे जाणवते. याविषयी प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य प.पू. डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.७.२०२४)