Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराचे बनावट संकेतस्थळ बनवून भाविकांची १० लाख रुपयांची फसवणूक
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्वनाथ मंदिराचे बनावट संकेतस्थळ बनवून भाविकांची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दर्शन, आरती आणि रुद्राभिषेक यांच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. भाविकांनी मंदिराशी संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस अन्वेषण करत आहेत.