विधान परिषद निवडणुकीत गद्दारी करणार्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार !
मुंबई – विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षाला मतदान करणारे ५ आमदार झिशान सिद्दीकी, हिरामण खोसकर, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात देहलीतून आदेश निघणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के.सी. वेणूगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही नावे निश्चित केली.