परिस्थिती स्वीकारणार्‍या आणि सेवाभाव असणार्‍या मथुरा सेवाकेंद्रातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्मिता कानडे (वय ५७ वर्षे) !

‘उद्या आषाढ पौर्णिमा (२१.७.२०२४) या दिवशी सौ. स्मिता कानडे यांचा ५७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. प्रणव मणेरीकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. स्मिता कानडे यांना ५७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !  

सौ. स्मिता कानडे

१. परिस्थिती स्वीकारणे

‘सौ. कानडेकाकू या प्रसारासाठी उत्तर भारतात आल्यावर त्यांनी येथील परिस्थितीशी जुळवून घेतले आहे, उदा. हवामान, भाषा आणि आहार. ‘येथील परिस्थितीला दोष देणे किंवा इथे सर्व कठीण आहे’, असे काकूंच्या बोलण्यात कधीही येत नाही. ‘त्यांनी येथील परिस्थिती पूर्णपणे स्वीकारली आहे’, असे मला वाटते.

श्री. प्रणव मणेरीकर

२. सेवाभाव

‘सौ. काकूंना कोणतीही सेवा सांगितल्यावर त्या कधीच ‘नाही’, असे म्हणत नाहीत. त्या ती सेवा लगेच स्वीकारतात. त्या सेवा करतांना नेहमी सकारात्मक आणि शिकण्याच्या स्थितीत असतात.

३. काकू प्रत्येक सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

४. साधकांच्या भावजागृतीच्या प्रयत्नात वाढ होणे

काकू मथुरा येथे आल्यानंतर साधकांचे भावजागृतीचे प्रयत्न वाढले आहेत. त्या सेवा करतांना मधे मधे थांबून गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) आर्तभावाने स्मरण करतात. त्या गुरुदेवांना ‘परम पूज्य, परम पूज्य’ अशी हाक मारतात. ‘सेवा करत असतांना अनुसंधान कसे ठेवायचे आणि भावावस्थेत कसे रहायचे ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

५. काकू प्रत्येक साधकाशी आदराने बोलतात.   

६. काकूंचा संतांप्रती पुष्कळ भाव आहे.’

– श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४४ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र (४.७.२०२४