स्वार्थी आणि निःस्वार्थी यांच्यातील आध्यात्मिक भेद
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
‘भगवंताच्या सेवकांची जे सेवा करतात, ते त्याचे सर्वश्रेष्ठ सेवक होत’, असे शास्त्रे सांगतात. निःस्वार्थपरता हीच धर्माची कसोटी होय. जो जितका अधिक निःस्वार्थ, तितका तो अधिक धार्मिक आणि शिवाच्या अधिक निकट असतो अन् एखाद्या स्वार्थी माणसाने झाडून सार्या मंदिरांचे उंबरठे झिजवले, सार्या तीर्थक्षेत्रांच्या वार्या केल्या आणि स्वतःला चित्यासारखे आडव्या-उभ्या पट्ट्यांनी सजवले, तरीही तो शिवापासून पुष्कळच दूर आहे, असे समजावे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)