Beed Maulvi Killed Hindu Boy : बीड येथे मौलवी शेख याने केलेल्‍या अमानुष मारहाणीत १ हिंदु मुलगा ठार : २ मुले घायाळ

दर्ग्‍याच्‍या परिसरातील जांभळे खाल्‍ल्‍याने केली अमानुष मारहाण


बीड – येथील दिंद्रुड येथे जिल्‍हा परिषद शाळेच्‍या जवळ असलेल्‍या मेहबूब सुभान दर्ग्‍याच्‍या परिसरातील झाडाला लागलेली जांभळे तोडून खाणार्‍या ३ विद्यार्थ्‍यांना मौलवी मुजीब शेख आणि त्‍याचा साथीदार समीर अत्तार कासम यांनी अमानुष मारहाण केली. यानंतर उपचार घेणारा तेजस कटारे (वय १३ वर्षे) मरण पावला आहे. या घटनेचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.

१. शाळेतून परत येत असतांना तेजस कटारे, रत्नेश्‍वर ठोंबरे आणि अन्‍य १ मुलगा यांनी दर्ग्‍याच्‍या परिसरातील असलेल्‍या झाडावरील जांभळे तोडून खाल्ली. त्‍या वेळी मौलवी मुजीब शेख आणि त्‍याचा साथीदार समीर अत्तार कासम तेथे आले आणि त्‍यांनी काठीने तिघांना अमानुष मारहाण करण्‍यास आरंभ केला.

२. या वेळी मौलवी शेख याने तेजस याच्‍या डोक्‍यावर काठी मारली, त्‍याला भूमीवर आपटले, तसेच त्‍याचा गळा घोटण्‍याचा प्रयत्न केला. यामुळे तो गंभीर घायाळ झाला. रत्नेश्‍वरही घायाळ झाला, तर अन्‍य १ घायाळ मुलगा मौलवी आणि कासम यांच्‍या कह्यातून निसटून पळून गेला.

३. तेजस याला रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले; मात्र उपचार घेतांना त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍याच्‍या आईने केलेल्‍या तक्रारीवरून मौलवी मुजीब शेख याला अटक करण्‍यात आली, तर समीर अत्तार कासम पसार झाला आहे.

संपादकीय भूमिका

  • मौलवी म्‍हणजे इस्‍लामचा धार्मिक नेता ! इस्‍लामी धार्मिक नेत्‍यांची मनोवृत्ती किती हिंसक आणि क्रूर असते, हेच या घटनेतून दिसून येते. असे नेते मुसलमान समाजाला काय शिकवण देत असतील, हे वेगळे सांगायला नको !
  • हिंदूंचे संत किंवा धर्माधिकारी यांच्‍यावर अकारण आरोप करून त्‍यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्‍यमे मुसलमानांच्‍या धार्मिक नेत्‍याने केलेला या क्रूर कृत्‍याला ठळक प्रसिद्धी देत नाहीत; कारण त्‍यांच्‍या मते मुसलमान समाज हा ‘धर्मनिरपेक्ष’ आहे !
  • ‘भारतात इस्‍लाम खतरे में’ असे म्‍हणणारे आता कोणत्‍या बिळात जाऊन लपले आहेत ?