Labor Minister Hale Jobs For Indians : भारतीय कामगारांसाठी जर्मनी द्वार उघडणार : लाखो भारतियांना नोकरीची संधी !

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीतील कामगारांच्या तुटवड्याला तोंड देण्यासाठी जर्मन सरकारने भारतीय कामगारांना नियुक्त करण्याची योजना आखली आहे. जर्मनीचे कामगारमंत्री हुबर्ट्स हेल यांनी या संदर्भात सरकारच्या योजनेची माहिती देतांना कुशल कामगारांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. या नवीन योजनेच्या अंतर्गत जर्मनीला भारतातून मोठ्या संख्येने कुशल कामगार नियुक्त करायचे आहेत. त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

१. कामगारमंत्री हेल म्हणाले की, जर्मनीमध्ये ७० हून अधिक व्यवसायांमध्ये कामगारांची कमतरता आहे. जर्मनीमध्ये भविष्यात कुशल कामगारांसाठी द्वार खुले रहातील. जर्मनीला वर्ष २०३५ पर्यंत ७० लाख कामगारांची आवश्यकता असेल.

२. वाहतूक, उत्पादन, बांधकाम, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान, या  क्षेत्रांत कामगारांची अधिक आवश्यकता आहे.

३.कामगारांसाठी अधिक आकर्षक योजना बनवण्यासाठी जर्मनी सरकारने अनेक क्षेत्रांत सुधारणा केल्या आहेत.