लोकसभा निवडणुकीतील विदेशी हस्तक्षेप !
‘निवडणुकांमध्ये होणारा हस्तक्षेप हा निवडणुका चालू झाल्यापासूनचा आहे. जेव्हा या खेळातील तज्ञांना त्यांनीच सिद्ध केलेल्या डावपेचांची चव घ्यावी लागते, तेव्हा या शब्दाला पूर्ण विकसित चलनाचे महत्त्व प्राप्त होते. उर्जेप्रमाणे निवडणुकांमधील हस्तक्षेप हा वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर होत असतो. आता झालेला हस्तक्षेप हा पहिला किंवा शेवटचा समजायचा नाही. या लेखामध्ये त्यामधील सर्वच डावपेचांचा उल्लेख येईल, असे नाही. निवडणुकांमध्ये कथानकांची महत्त्वाची भूमिका आणि ती कशा प्रकारे पसरवली जातात, यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे.
१. भूराजकीय बुद्धीबळाच्या पटावर भारत केंद्रस्थानी
‘वर्ष २०२४ हे जगातील लोकशाहीसाठी महत्त्वाचे वर्ष आहे. या वर्षी सरकार निवडण्यासाठी ६० हून अधिक राष्ट्रांंमध्ये निवडणुका नियोजित आहेत. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये १९ एप्रिल ते १ जून २०२४ या कालावधीमध्ये निवडणुका झाल्या. या लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या लोकांच्या सहभागाने जगाचे लक्ष वेधून घेतले. या वेळी १४० कोटी लोकांपैकी मतदानासाठी पात्र असलेल्या ९६ कोटी लोकांना लोकशाहीचे खरे सार दाखवण्याची संधी मिळाली. विभागीय सत्तांमध्ये भारताचा झालेला उदय आणि भारताचे भूराजकीय डावपेचाच्या दृष्टीने वाढलेले महत्त्व यांमुळे भारतातील निवडणूक ही जागतिक घटना ठरली. भूराजकीय दृष्टीकोनातून पहाता भारतातील निवडणुकांना जगात अतिशय महत्त्व प्राप्त झाले. भारत उदयास आलेली महत्त्वाची नवीन आर्थिक सत्ता आहे. त्यामुळे निवडणूक निकाल जगातील चलनशास्त्र घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
त्याचा प्रारंभ सत्तेवर आलेल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली कार्यालयातून ठरवल्या जाणार्या परराष्ट्र धोरणापासून आहे. अमेरिका, चीन आणि रशिया या देशांतील उभयपक्षी संबंधांचा नाजूकपणे समतोल साधतांना भारताने काही वेळ स्वतंत्र भूमिका घेऊन या देशांना चकीत केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध किंवा इस्रायल-हमास यांमधील युद्ध या जागतिक संकटांच्या वेळी भारताने आपले वेगळे असे परराष्ट्र धोरण दाखवून दिले आहे. त्यामुळे ‘भूराजकीय बुद्धीबळाच्या पटावर भारत हा केंद्रस्थानी आहे’, असे आपण म्हणू शकतो.
केवळ ‘जगातील मोठी लोकशाही’ म्हणून नव्हे, तर नवीन उदयाला येणारी आर्थिक आणि डावपेचात्मक सत्ता म्हणून भारताचे महत्त्व वाढत जात आहे. त्यामुळे या ‘डिजिटल’ युगात कथानके निर्माण करणारी जागतिक प्रसारमाध्यमे आणि बुद्धीवंत यांना जगातील मोठ्या लोकशाहीमध्ये घडणार्या या घटनेवर अधिक लक्ष देणे अनिवार्य ठरले आहे.
२. देशी आणि विदेशी प्रसारमाध्यमांचा लोकसभा निवडणुकीमध्ये हस्तक्षेप
प्रसारमाध्यमे किंवा वर्तमानपत्रे हे लोकशाहीचे शक्तीशाली स्तंभ आहेत. त्यांचे निवडणुकीतील उत्तरदायित्व अधिक प्रमाणात आहे. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणताही हस्तक्षेप करून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करणे टाळून नैतिक मूल्ये जपली पाहिजेत. जेव्हा कोट्यवधी हिंदू त्यांचे भविष्य ठरवत होते, तेव्हा दुर्दैवाने जागतिक प्रसिद्धीमाध्यमांचा एक विभाग आणि काही विद्वान त्यांच्या निर्णयाचा प्रभाव समाजावर पाडण्याविषयी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करत होते. या नियोजनाची व्याप्ती केवळ पाश्चिमात्य प्रसिद्धीमाध्यमांपुरती नव्हती, तर भारतातील काही प्रसिद्धीमाध्यमे ज्यांना कोणताही आकार दिला जाऊ शकत होता, तीही अग्रेसर होती. भारतातील निवडणुकांविषयी बातम्या देतांना पाश्चात्त्य प्रसिद्धीमाध्यमे निवडणुकीशी संबंधित सर्व गोष्टींवर (एका प्रसिद्धीमाध्यमाने भर उन्हाळ्यात निवडणुका घेतल्याविषयी निवडणूक आयोगाला दोषी ठरवले.) अथकपणे आक्रमणे करत होती. वरवर पहाता यात काही वेगळे आहे, असे वाटत नव्हते. भारतातील निवडणुकांविषयी लेख, संशोधनात्मक अहवाल इत्यादींमधून ६ मास विवेकशून्य लिखाण प्रसिद्ध केले जात होते. या प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध केल्या जाणार्या लेखांमध्ये एक आश्चर्यकारक नमुना होता. (यापैकी बहुतांश लेख हे काही संस्थांकडून कार्यान्वित केले गेले होते.)
दक्षिण आशियातील लोक हे पाश्चात्त्य प्रसिद्धीमाध्यमांना उपरे नाहीत, हे त्यांच्या पूर्वग्रहयुक्त संपादकीय आणि वर्चस्ववादी साहित्यांमध्ये असलेल्या वसाहतवादाच्या प्रभावावरून दिसून येते; परंतु या वेळी भारतातील निवडणुकांविषयी सांगताना त्यांचा सूर वेगळा होता. पूर्वी याविषयी संशयित असलेल्या ‘बीबीसी’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’ यांचा भारतात प्रसार करण्यामागचा हेतू इतरांनी उघड केला आहे. या निवडणुकीच्या वेळी काही जणांकडून समन्वय साधून प्रयत्न केले गेले. जागतिक स्तरावरील प्रसिद्धीमाध्यमांकडून काही विशिष्ट कथानकांचा प्रसार करून मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट, म्हणजे हा प्रयत्न फ्रेंच प्रसिद्धीमाध्यमांद्वारे करण्यात आला. यामध्ये फ्रान्समधील सर्वांत प्रभावी आणि पुष्कळ खप असलेल्या ‘ली मोन्दे’ या वर्तमानपत्राचा समावेश होता. या सर्वांत लक्षात येण्याजोगा नमुना, म्हणजे संपादकीय पानाच्या दुसर्या बाजूला घेतला जाणारे लिखाण किंवा लेख होय. हे लेख फ्रेंच राजकीय तज्ञ आणि संशोधक असलेले ख्रिस्तोफे जेफ्रिलॉट यांचे मुलाखत किंवा विधाने यांवर आधारीत होती.
३. निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी विदेशी संस्थांकडून मोठी आर्थिक रसद
भारतीय निवडणुकांविषयीच्या चर्चांचे विश्लेषण करतांना पाश्चिमात्य प्रसिद्धीमाध्यमे, तसेच भारतातील काही प्रसिद्धीमाध्यमे यांनी लिहिलेल्या लेखांचा जेफ्रिलॉट हा महत्त्वाचा स्रोत होता आणि त्यातून भारतातील निवडणुकांना लक्ष्य केले गेले होते. या खेळामध्ये तो एकटाच खेळाडू नव्हता. जेव्हा आम्ही भारतातील निवडणुकांच्या वेळी भारताबाहेरील घटना आणि कारवाया यांचा अभ्यास केला, तेव्हा आम्हाला एक विशिष्ट गोष्ट दिसून आली. ती म्हणजे या सर्व घटना, व्यक्ती आणि कथानके या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे सर्वांना दिला गेलेला निधी होय. या कारवाया करण्यामागील पद्धती आणि त्यातील प्रमुख आघाड्या या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. याविषयी काम करणार्या प्रमुख घटकांना ‘हेन्री लुसी फाऊंडेशन’ आणि ‘जॉर्ज सोरोस ओपन सोसायटी फाऊंडेशन’ यांच्याकडून थेट निधी पुरवला गेला. यासंदर्भात काम करणारे गट आणि व्यक्ती यांचे फ्रान्स आणि अमेरिका या देशांबाहेर मोठे जाळे असून भारतातील निकालांवर प्रभाव पाडण्यासाठी त्यांना अमेरिकास्थित दात्यांकडून निधी पुरवला जात आहे. भारताविषयीचा उल्लेख करतांना ‘भारतातील लोकशाहीचा र्हास होत आहे’, ‘हिंदूंचे प्राबल्य वाढत आहे’ आणि ‘फॅसिस्ट विचारसरणी उदयास येत आहे’ या सूत्रांचा मुख्य प्रवाहातील व्याख्यानांच्या वेळी उल्लेख करण्यात आला. तो विचार मुख्य प्रवाहात स्थापित करणार्या संस्थांना या अहवालाद्वारे प्रकाशात आणण्याचा प्रयत्न आहे. वाचकांना जर जॉर्ज सोरोस यांनी वर्ष २०२३ मध्ये ‘डेमोक्रेटिक रिव्हायवल इन इंडिया’ यावर दिलेले भाषण आठवत असेल, तर त्याचा या सर्वांशी संबंध आहे, हे लक्षात येईल.
(साभार : ‘द डिसइन्फोलॅब डॉट ऑर्ग’चे संकेतस्थळ)