नामजपाप्रती दृढ श्रद्धा आणि गुरुदेवांप्रती भाव असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची अयोध्या येथील कु. आनंदिता श्रीवास्तव (वय १० वर्षे) !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. आनंदिता श्रीवास्तव हिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे.’ – संकलक)
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आनंदिता श्रीवास्तव या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जिज्ञासू वृत्ती
‘आनंदिता ‘एखादी कृती चांगल्या प्रकारे कशी करता येईल ?’, असा विचार करून त्याप्रमाणे कृती करते.
२. धर्माभिमान
आनंदिताला ‘सामान्यज्ञान’ या विषयावरील पाठ्यपुस्तकात अन्य पंथीय समाजाच्या संदर्भात एक धडा होता. तेव्हा तिने ‘हा धडा मी वाचणार नाही’, असे सांगितले.
३. चुकांविषयी संवेदनशीलता
एखाद्या प्रसंगात आनंदिताची चूक झाली असेल, तर ती स्वतःची चूक स्वीकारून लगेचच क्षमा मागते. त्यासाठी तिला सांगावे लागत नाही. ती चुकांचे निरीक्षण चांगले करते, उदा. मी एखाद्या व्यक्तीवर रागावल्यास आनंदिता मला योग्य दृष्टीकोन देते.
४. नामजपाप्रती दृढ श्रद्धा
एखाद्या प्रसंगात आम्ही अस्थिर झाल्यास ती आम्हाला नामजप करायला सांगते. ‘नामजपाने सर्व त्रास दूर होतात’, असा तिचा भाव आहे.
५. गुरूंप्रती भाव
अ. आनंदिताची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे. तिला डोळे बंद केल्यावर डोळ्यांसमोर ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव स्मितहास्य करत आहेत’, असे दिसते. तिने डोळे बंद केल्यावर तिला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होते. ‘गुरुदेव प्रत्येक प्रसंगात रक्षण करणार आहेत’, अशी तिची श्रद्धा आहे.
आ. एकदा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आनंदिताला तिच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्णाचे बालरूपातील एक चित्र दिले होते. आनंदिता नेहमी चित्रातील श्रीकृष्णाशी बोलते. ती रात्री झोपतांना ते छायाचित्र समवेत ठेवते.
६. स्वभावदोष
चिडचिडेपणा आणि भावनाशीलता.’
– सौ. कनुप्रिया श्रीवास्तव (कु. आनंदिताची आई), अयोध्या, उत्तरप्रदेश. (२४.३.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.