विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्याविषयी आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍या धर्मांधाला मुंबईत अटक !

मुंबई – प्रशासनाकडून विशालगडावरील अतिक्रमण हटवल्याप्रकरणी आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी अंधेरी येथून महंमद मासूम रजा शमीम शेख याला अटक केली. शेख याच्या विरोधात ‘एम्.आय.डी.सी.’ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी संतप्त जमावाने अतिक्रमण झालेल्या भागामध्ये दगडफेक केली. या वेळी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर भागात हिंसाचार उसळला. यानंतर सामाजिक प्रसारमाध्यमांवरून ‘दंगल पसरू नये’, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात दंगल पसरवण्याला प्रतिबंध करणारे भादंवि १६३ कलम लागू करण्यात आले आहे.