Chhattisgarh Muharram Attack : छत्तीसगडमध्ये मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी मुसलमान मुलांनी हिंदु मुलाला आगीत ढकलले !
|
रायपूर – छत्तीसगडमधील कोरबा येथे मोहरमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ताजिया मिरवणुकीत एका हिंदु अल्पवयीन मुलाला आगीत ढकण्यात आले. त्यामुळे तो गंभीर घायाळ झाला. त्याच्या अल्पवयीन भावालाही आगीत ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही मुलांचा मुसलमान समाजातील मुलांशी काही कारणावरून वाद झाला होता. या प्रकरणी ८ अल्पवयीन मुलांना कह्यात घेण्यात आले आहे.
१. ही घटना कोरबा येथील नॉनबिर्रा गावात घडली. मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी २ अल्पवयीन हिंदु मुले दुकानात बसली होती. या वेळी काही तरुणांनी येथे येऊन त्यांच्याशी वाद घातला.
२. आक्रमण करणार्या मुसलमान तरुणांची संख्या मोठी होती. २ हिंदु मुलांशी वाद घातल्यानंतर मुसलमानांच्या जमावाने त्यांना शेजारी जळणार्या आगीत ढकलून दिले. यात १ हिंदु मुलगा बचावला; मात्र दुसरा मुलगा गंभीर घायाळ झाला. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घायाळ झालेल्या हिंदु मुलाला उपचारांसाठी रुग्णालयात नेले.
३. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. या घटनेविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. आगीत होरपळलेला मुलगा आणि मुलांवर आक्रमण करणारे यांच्यामध्ये जुना वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|