US Cop Fired : भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर हसणारा अमेरिकन पोलीस अधिकारी बडतर्फ !

वॉशिंग्टन – अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर असंवेदनशील टिप्पणी करणार्‍या आणि हसणार्‍या पोलीस अधिकार्‍याला बडतर्फ करण्यात आले आहे.  वॉशिंग्टनमधील नॉर्थईस्टर्न विद्यापिठात शिकणारी विद्यार्थिनी जान्हवी कंदुला (वय २३ वर्षे) ही २३ जानेवारी या दिवशी रस्ता ओलांडत असतांना पोलिसांच्या वाहनाने तिला धडक दिली. पोलिसांची गाडी केविन डेव्ह नावाचा अधिकारी चालवत होता आणि दुसर्‍या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी संबंधित ठिकाणी पोचायचे असल्याने तो वेगाने गाडी चालवत होता. वाहनाने धडक दिल्यानंतर कंदुला १०० फूट अंतरावर पडली. सिएटल पोलीस विभागाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी डॅनियल ऑर्डर या भीषण अपघातावर हसतांना आणि उपहासात्मक टिप्पणी करतांना दिसत आहे.

शिस्तभंगाच्या कारवाईच्या अहवालात म्हटले आहे आहे की, पोलीस अधिकार्‍याच्या कृतीमुळे सिएटल पोलीस विभागाला लज्जेने मान खाली घालावी लागली.  या अधिकार्‍याला पदावर राहू देणे, हा संपूर्ण पोलीस विभागाचा अपमान होईल. या कारणास्तव त्याला बडतर्फ करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका 

यावरून अमेरिकेन पोलिसांच्या मनात भारतियांविषयी किती घृणा आहे, हे उघड होते ! अशांकडून भारतियांना कधी न्याय मिळेल का ?