बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणात आयात !
सरकारने तात्काळ कारवाई करण्याची ‘मगोप’चे आमदार जीत आरोलकर यांची मागणी
पणजी, १७ जुलै (वार्ता.) – गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी आहे, तरीही गोव्यात गणेशचतुर्थीला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात. सरकारने अशा मूर्तींची आयात रोखण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ‘मगोप’चे आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेत १७ जुलै या दिवशी शून्य प्रहराच्या वेळी गोवा हस्तकला मंडळाकडे केली.
आमदार जीत आरोलकर म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात पुजल्या जातात आणि यामुळे पर्यावरण आणि जलस्रोत यांना धोका निर्माण झाला आहे. सरकारने अशा मूर्तींच्या आयातीवर कठोर देखरेख ठेवावी आणि पारंपरिक मूर्तीकारांना चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवण्यास प्रोत्साहन द्यावे.’’
संपादकीय भूमिका
|