गोवंशियांच्या वाहतूक प्रकरणी दाभोळ (रत्नागिरी) येथे गुन्हा नोंद
दाभोळ – दापोली तालुक्यातील दाभोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ जुलैच्या रात्री बेकायदेशीरपणे एका बैलाची हत्या करण्याच्या हेतूने वाहतूक करण्यात येणार्या वाहनाला पकडण्यात आले. या प्रकरणी दाभोळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
एका हिंदूने आरोपी अब्दुल रौफ माखजनकर यास बैल विकला. या वेळी तक्रारदार नरेश मोहिते यांनी बैल घेऊन जात असलेले वाहन पाठलाग करून थांबवले आणि त्यांना पोलिसांच्या कह्यात दिले. (गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही केव्हा होणार ? – संपादक)