मागील ३ वर्षांत मुंबईत १३ सहस्र आगीच्या दुर्घटना घडून ६५ जण ठार !
मुंबई – वर्ष २०२० ते २०२३ या ३ वर्षांत मुंबईमध्ये तब्बल १३ सहस्र आगीच्या दुर्घटना घडल्या. यांमध्ये ६५ जणांचा मृत्यू झाला, तर ४७३ जण घायाळ झाले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेकडून शहरातील १ सहस्र २७० इमारतींची अग्नीसुरक्षाविषयक पडताळणी करण्यात आली असता त्यांमधील २७८ इमारतींमध्ये आगप्रतिबंधक आणि जीवनसंरक्षक उपाययोजनांमध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले. या इमारतींना अग्नीशमन विभागाकडून नोटीस पाठवल्यात आली आहे. अग्नीशमनयंत्रणा कार्यान्वित न केल्यास वीज आणि पाणी यांची जोडणी कापण्याची चेतावणी देण्यात आल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही मुंबईत सर्व इमारतींत अग्नीशमन यंत्रणा का नाही ? |