Naseebuddin and Murtaza Hasan  Arrested : महिलेचा अंघोळ करतांनाचा व्हिडिओ बनवणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

व्हिडिओ अश्‍लील संकेतस्थळांवर प्रसारित करून कमवले पैसे !

नसीबुद्दीन आणि मुर्तजा हसन

गौहत्ती – आसाम पोलिसांनी नागाव येथे एका महिलेच्या घरी अंघोळ करतांनाचा व्हिडिओ बनवल्याच्या प्रकरणी नसीबुद्दीन आणि मुर्तजा हसन नावाच्या दोघा धर्मांध तरुणांना अटक केली आहे. ही घटना नागावच्या खुटीकोटिया भागात घडली.


याविषयीच्या एका वृत्तानुसार, १४ जुलै या दिवशी महिलेच्या लक्षात आले की, कुणीतरी तिचा व्हिडिओ बनवत आहे. ती अंघोळ करत असतांना आरोपी ‘व्हेंटिलेशन’ असलेल्या ठिकाणावरून भ्रमणभाषमधील कॅमेराद्वारे व्हिडिओ बनवत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरडा केला. त्यानंतर तिचे कुटुंबीय आणि शेजारी घटनास्थळी पोचले. त्यांनी आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपींचे भ्रमणभाष जप्त केले आहेत. आरोपी हे व्हिडिओ अश्‍लील संकेतस्थळांवर प्रसारित करून पैसे कमवत होते.