Assam CM On Muslim Population : आसाममध्ये मुसलमानांची लोकसंख्या ४० टक्क्यांपर्यंत वाढणे माझ्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे गंभीर विधान !
रांची (झारखंड) – आसाममधील वेगाने पालटणारी लोकसंख्येची रचना माझ्यासाठी मोठी समस्या आहे. आज आसाममध्ये मुसलमानांची लोकसंख्या ४० टक्क्यांवर पोचली आहे. वर्ष १९५१ मध्ये मुसलमान १२ टक्के होते. आज आपण अनेक जिल्हे गमावले आहेत. हे माझ्यासाठी राजकीय सूत्र नाही. माझ्यासाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे, अशा शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी आसाममधील परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री सरमा यांनी १ जुलै या दिवशीही अशाच प्रकारचे विधान केले होते. ते म्हणाले होते की, एक समाज गुन्हेगारी कारवाया करत आहे. हे लोक एका विशिष्ट धर्माचे असून ही चिंतेची गोष्ट आहे. मी असे म्हणत नाही की, एकाच धर्माचे लोक हे करत आहेत; पण लोकसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती चिंताजनक आहे. आसाममध्ये केवळ बांगलादेशातून आलेले लोक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्य समाजातील लोकांनी काँग्रेसला मतदान केले आहे.
‘Changing demography’ is a big issue. Mu$l!m population in Assam now 40%. It’s A ‘Matter Of Life & Death’ – Assam CM Himanta Biswa Sarma
To deal with such a serious situation, along with tough laws, strict decisions needs to be taken by CM Sarma !#CAApic.twitter.com/QCxA6VK3jp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 17, 2024
संपादकीय भूमिकाइतकी गंभीर स्थिती निर्माण झालेली असतांना मुख्यमंत्री सरमा यांनी कठोर कायदे करण्यासह कठोर निर्णय घेणेही आवश्यक आहे ! |