Oman Oil Tanker Capsize : ओमानच्या किनार्यावर तेल वाहतूक करणारी नौका बुडाली !
१३ भारतियांसह १६ कर्मचारी बेपत्ता
मस्कत (ओमान) – ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै या दिवशी ओमानजवळील समुद्रात तेल वाहतूक करणारी मोठी नौका बुडाली आहे. यात १३ भारतीय आणि श्रीलंकेचे ३ कर्मचारी होते. हे सर्व जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
सागरी सुरक्षा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार ‘प्रेस्टिज फाल्कन’ नावाचीही नौका दुबईतील हमरिया बंदरातून निघाली होती. ती येमेनच्या एडन बंदराच्या दिशेने जात होती. ही नौका वाटेत डुकम बंदर शहराजवळ आग्नेय-पूर्वेला सुमारे ४६ कि.मी. अंतरावर उलटली.