२००६ च्या मुंबई लोकलगाड्यांतील बाँबस्फोट प्रकरणाची सुनावणी चालू

संग्रहित चित्र

मुंबई – उपनगरीय लोकलगाड्यांमध्ये वर्ष २००६ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट खटल्यातील दोष सिद्ध झालेल्या आरोपींचे अर्ज आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपिठासमोर १५  जुलैपासून सुनावणी चालू झाली. ९ वर्षांनंतर ही सुनावणी चालू झाली असून ती पुढील ६ महिने नियमितपणे घेतली जाणार आहे.

या प्रकरणात सप्टेंबर २०१५ मध्ये १२ पैकी ५ जणांना फाशीची आणि इतर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लगेचच आरोपींना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून म्हणजे गेल्या १८ वर्षांपासून ते अटकेत आहेत. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा पुष्टीकरणाचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका :

विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच नव्हे का ?