परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त काढलेली दिंडी पाहून समाजातील व्यक्तींचा गुरुपौर्णिमा महोत्सवातील सहभाग
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त काढलेली दिंडी पाहून प्रभावित होऊन स्वतःच्या दुकानातील वस्तू अर्पण करणारे श्री. यतिन दास !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त काढलेली दिंडी श्री. यतिन दास यांच्या दुकानाच्या समोरून गेली होती. ते दिंडी पाहून प्रभावित झाले. आम्ही साहित्य विकत घेण्यासाठी त्यांच्या दुकानात गेल्यावर त्यांनी दिंडीचे कौतुक केले आणि सांगितले, ‘‘मी माझ्या दुकानातील वस्तू अर्पण स्वरूपात देतो.’’ ते रविवारच्या दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले करत असलेल्या कार्याचे कौतुक करणारे आणि स्वतःच्या दुकानातील भांडी अर्पण स्वरूपात देणारे श्री. कंदले !
श्री कंदले यांचे भांड्यांचे दुकान आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त काढलेली दिंडी त्यांच्या दुकानाच्या समोरून गेली होती. ते साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कौतुक करत होते. ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले कार्य करत आहात. तुम्ही घर सांभाळून हिंदूंना जागृत करत आहात. आम्ही अर्पणाच्या माध्यमातून तुमच्या कार्यात सहभागी होऊ शकतो. लव्ह जिहादसाठी सर्वांची एकजूट होणे आवश्यक आहे.’’ त्यांनी आम्हाला आवश्यक ती काही भांडी अर्पणात दिली.
– सौ. वर्षा वैद्य, सोलापूर (१०.७.२०२३)