वर्ष २०२३ मधील गुरुपौर्णिमा महोत्सवात साधिकेला आलेल्या अनुभूती
१. ‘मी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सोहळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी सभागृहात गेले होते. तेव्हा मला जाणवले, ‘मी विष्णुलोकात आहे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व सेवा करून घेत आहेत.’
२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने गुरुपौर्णिमेच्या दिवशी अखंड भावस्थिती अनुभवणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या आनंदात वृद्धी झाली. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची मानसपूजा केली. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. मानसपूजा संपल्यावर आरती झाली. त्यानंतर माझे लक्ष व्यासपिठावरील आसंदीकडे गेले. तेथे मला ‘२ पावले उमटली आहेत’, असे दिसले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मी अखंड भावस्थिती अनुभवली.’
– सौ. संध्या जावळे, बार्शी, सोलापूर (२७.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |