J&k Terrorists : काश्मीर खोर्यात घुसले आहेत ६० प्रशिक्षित आतंकवादी ! – माजी अधिकारी मेजर जनरल पी.के. सेहगल
नवी देहली – गेल्या महिनाभरात पाकिस्तानातून तब्बल ६० प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रे असलेले आतंकवादी काश्मीर खोर्यात घुसले आहेत, अशी माहिती सैन्याचे माजी अधिकारी मेजर जनरल पी.के. सेहगल यांनी दिली.
60 highly trained terrorists have breached the Kashmir Valley. – Defence Expert Major General (Retd) PK Sehgal
It is disappointing that the terrorists are still successful at infiltrating & causing mayhem, even after 3 decades.
जम्मू कश्मीर pic.twitter.com/9BFTMu0a9y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 16, 2024
पी.के. सेहगल पुढे म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाली होती. घुसखोरी केलेल्या काही आतंकवाद्यांना आपण ठार मारले आहे. आता उर्वरितांना शोधून काढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स यांच्या साहाय्याने त्यांचे ठिकाण शोधून काढणे आवश्यक आहे. हे आतंकवादी प्रशिक्षित असून त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये गेली ३ दशके घुसखोरी करून हिंसाचार करत आहेत आणि भारत त्यांना रोखू शकत नाही, हे लज्जास्पद ! |