SCO Jaishankar : आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर
अस्ताना (कझाकस्तान) – येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (‘एस्.सी.ओ.) परिषदेच्या प्रमुखांच्या २४ व्या बैठकीविषयी बोलतांना भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, ‘आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. आतंकवादामुळे जागतिक आणि प्रादेशिक शांतता धोक्यात आली आहे. आतंकवादासारख्या गुन्ह्यांचे सूत्रधार आणि वित्तपुरवठादार यांना शोधून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ आतंकवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांविरुद्ध लढण्यास प्राधान्य देईल.’ या परिषदेला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हेही उपस्थित होते.
संपादकीय भूमिकागेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते ! |