Mukesh Sahani Father Murder : बिहारमध्ये ‘विकासशील इंसान पार्टी’च्या अध्यक्षांच्या वडिलांची हत्या !
बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
बिहार – ‘विकासशील इंसान पार्टी’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि उत्तरप्रदेशाचे माजी मंत्री मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी यांची त्यांच्या रहात्या घरात अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. ही घटना रात्री घडली. सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. या हत्येमागील कारण आणि आरोपी यांच्याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मुकेश यांचे वडील घरात एकटेच रहात होते. पोलिसांनी सांगितले की, चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली. चोरीच्या वेळी विरोध झाल्यानेच जीतन साहनी यांना ठार मारण्यात आले.
🚨’Vikassheel Insaan Party’ president Mukesh Sahani’s father murdered in Bihar
👉The law and order situation in Bihar is in shambles!@sonofmallah pic.twitter.com/nrTMSxcdQv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 16, 2024
मुकेश साहनी यांच्या वडिलांच्या हत्येचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले आहे.