Jihadi Terrorism in Doda Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ४ सैनिक आणि एक पोलीस यांना वीरमरण !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणात ३ सैनिक, १ कॅप्टन आणि १ पोलीस यांंना वीरमरण आले. डोडा जिल्ह्यातील डेसा जंगलातील धारी गोटे उरारबागी येथे ही घटना घडली. गेल्या दीड महिन्यात आतंकवाद्यांच्या आक्रमणात १४ सैनिकांना वीरमरण आले आहे.
Four Indian Army soldiers, including a Major martyred in Doda Encounter
48 Soldiers Killed In Action In Jammu and Kashmir In 32 Months
Endless ji#adi terrorism in Kashmir!
Repeated incidents of terror in Kashmir, despite knowing who is behind this, indicate that the… pic.twitter.com/iQr30SS8JN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 16, 2024
राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलीस १५ जुलैपासून येथे शोधमोहीम राबवत होते. शोध चालू असतांना आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि पळून गेले. सैनिक आणि पोलीस यांनी त्यांचा पाठलाग केला. घनदाट जंगलामुळे आतंकतवादी सैनिकांना चकमा देत राहिले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला. यामध्ये ४ सैनिक आणि १ पोलीस घायाळ झाला. त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील न संपणारा जिहादी आतंकवाद ! काश्मीरमधील या आतंकवादामागे कोण आहे ?, हे ठाऊक असूनही भारतीय शासनकर्त्यांमध्ये त्याचा समूळ नाश करण्याची इच्छाशक्ती नाही, हेच पुनःपुन्हा अशा घटनांवरून समोर येत रहाते. हे भारताला लज्जास्पद ! |