India Palestine Relief Aid : भारत यावर्षी पॅलेस्टाईनला ४२ कोटी रुपयांचे साहाय्य करणार !

नवी देहली – भारत सरकारने वर्ष २०२४-२५ साठी पॅलेस्टिनी निर्वासितांना साहाय्य करण्यासाठी ‘युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी’ला ५० लाख अमेरिकी डॉलर्स (४२ कोटी रुपयांची) देण्याची घोषणा केली. यातील २५ लाख अमेरिकी डॉलरचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. भारत सरकारने वर्ष २०२३-२४ साठी पॅलेस्टाईनला ३५ लाख अमेरिकी डॉलरचे साहाय्य केले होते. आर्थिक साहाय्यासाठी दिलेली रक्कम थेट पॅलेस्टाईनकडे सुपुर्द केली जात नाही, तर ती संयुक्त राष्ट्रांच्या साहाय्य आणि कार्य संस्थेकडे सुपुर्द केली जाते.

संपादकीय भूमिका

भारताने बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांतील किती हिंदु निर्वासितांना साहाय्य केले आहे ? इतकेच नाही, तर काश्मीरमधून ३५ वर्षांपूर्वी निर्वासित झालेल्या हिंदूंना सरकारने किती साहाय्य केले आहे ?, याची माहितीही सांगायला हवी !