ध्येयाप्रत कार्यरत रहाणे महत्त्वाचे !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

स्वामी विवेकानंद

घरोघर जाऊन ईशप्राप्तीच्या ध्येयाचा प्रचार करा. त्याने तुमचे स्वतःचे भले तर होईलच; पण त्यासमवेतच तुम्ही आपल्या देशाचेही हित साधाल. आपल्या देशाच्या सर्व भावी आशा तुमच्यावरच अवलंबून आहेत. तुमचे क्रियाशून्य जीवन बघून माझ्या हृदयाला अत्यंत तीव्र वेदना होत आहेत. कामाला लागा ! कामाला लागा ! रेंगाळू नका, उगीच वेळ गमावू नका, दिवसेंदिवस मृत्यू तुमच्या अधिकाधिक निकट येत आहे. ‘वेळ आली की, मग सर्वकाही करू’, असा विचार करून आळसात काळ घालवू नका. अशाने तुमच्या हातून काहीच घडणार नाही, हे लक्षात ठेवा.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)