कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेगाड्या रहित !

मुंबई – कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत १४ गाड्या रहित करण्यात आल्या आहेत. ७ गाड्या दुसर्‍या मार्गाने वळवण्यात आल्या असून ४ गाड्या अंशतः रहित केल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गाड्या रहित झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

रहित करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या

मांडवी एक्सप्रेस (१०१०३), मडगाव जं. सावंतवाडी रोड पॅसेंजर (५०१०८), सावंतवाडी रोड-दिवा एक्सप्रेस (१०१०६), वन्दे भारत एक्सप्रेस (२२२२९), मांडवी एक्सप्रेस (१०१०४), तुतारी एक्सप्रेस (११००४), मंगळुरु जं.- मुंबई एक्सप्रेस (१२१३४), मुंबई सी.एस्.एम्.टी.-मंगळुरू जं. (१२१३३), कोकण कन्या एक्सप्रेस (२०१११), तुतारी एक्सप्रेस (११००३), रत्नागिरी दिवा पॅसेंजर (५०१०४), जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५१), दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेस (१०१०५)