खानापूर, जिल्हा बेळगाव येथील कु. संध्या गावडा यांना रामनाथी, गोवा येथील आश्रमात आलेल्या अनुभूती
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रतिदिन प्रार्थना केल्यामुळे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्याची संधी मिळणे
‘मी प्रतिदिन गुरुदेवांना ((सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना करायचे, ‘हे गुरुदेव, मला रामनाथी आश्रमात येण्याची आणि सेवा करण्याची संधी द्या.’ गुरुमाऊलींनी माझी प्रार्थना ऐकली आणि मला रामनाथी आश्रमात सेवा करण्याची संधी मिळाली. मी आश्रमात प्रत्येक सेवा प्रार्थना करून करत होते. मला सेवा करतांना उत्साह जाणवत होता. ‘सेवा हे गुरुकृपेचे माध्यम आहे. सेवा करतांना ‘गुरुदेव माझ्या आजूबाजूलाच असून ते मला सेवा करण्यासाठी साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवत होते.
२. आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती
अ. ध्यानमंदिर चैतन्याने पिवळसर झालेले दिसत होते.
आ. तेथील वातावरण शांत आणि प्रसन्न जाणवत होते.
इ. तेथे नामजप करत असतांना ‘गुरुदेव माझ्या समोर आहेत आणि मी त्यांच्या चरणांवर फुले वहात आहे अन् त्यांची आरती करत आहे’, असे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर येत होते.
३. गुरुदेवांच्या सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. एकदा मला गुरुदेवांच्या सत्संगाला जाण्याची संधी मिळाली. गुरुमाऊलींचे आगमन झाल्यावर मला ‘भगवान श्रीकृष्ण साक्षात् रथातून प्रवेश करत आहे आणि सगळे वातावरण स्थिर झाले आहे’, असे जाणवले.
आ. गुरुमाऊलींना पाहून डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. ‘गुरूंचे सगुण रूप डोळ्यांत किती सामावून घेऊ !’, असे मला वाटत होते.
इ. गुरुमाऊलींचे दर्शन झाले आणि माझ्या जीवनाचे सार्थक झाले.’
– कु. संध्या गावडा, गलगुंजी, खानापूर, जिल्हा बेळगाव.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |