गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडल्यावर साधिकांना रिक्शाने घरी जातांना अनेक अडचणी येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने एका रिक्शावाल्याने साधिकांना घरापर्यंत सुखरूप पोचवणे

सौ. दुर्गा कुलकर्णी

‘३.७.२०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडल्यावर आम्ही साधिका घरी जाण्यास निघालो. तेव्हा आम्हाला एक रिक्शाचालक भेटले. ते आम्हाला म्हणाले, ‘‘माझी रिक्क्षा मधेच बंद पडते. मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही.’’ आम्ही त्यांना विनंती केल्यावर ते आम्हाला १८० रुपये भाडे आकारून रिक्शाने घेऊन जाण्यास सिद्ध झाले. आमचे त्यांच्याशी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव आणि अध्यात्म’ यांविषयी बोलणे झाले.

त्या दिवशी पुष्कळ पाऊस पडला होता. त्यामुळे मार्गावर सगळीकडे पाणी साठले होते. अकस्मात् आमची रिक्शा पाण्यात अडकली. तेव्हा आम्ही घाबरलो आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धावा करून नामस्मरण चालू केले. आम्ही रिक्शातून कसेतरी खाली उतरलो. रिक्शाचालकांनी अन्य लोकांच्या साहाय्याने पाण्यात अडकलेली रिक्शा बाहेर काढली. त्यानंतर मार्गाने जात असतांना आमच्या घरापर्यंत रिक्शा बंद पडली नाही. त्यांनी आम्हाला रिक्शाने घरापर्यंत पोचवले.  त्यांनी आमच्याकडून १५० रुपयेच भाडे घेतले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही आपत्कालीन परिस्थितीतून वाचलो, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. दुर्गा कुलकर्णी (वय ७० वर्षे), कुमठा नाका, सोलापूर. (१०.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक