गुरुदेवांचे कसे करू वर्णन !
लांजा (रत्नागिरी) येथील सनातन संस्थेच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहिलेले काव्य येथे दिले आहे.
गुरुदेवांचे कसे करू वर्णन ।
कारण मी आहे सर्वसामान्य ।।
तरी करते थोडा प्रयत्न ।
मी आहे कोटी कोटी कृतज्ञ ।। १ ।।
लेकराचे बोल गोड करून घ्यावे ।
आपणच मजकडून लिहून घ्यावे ।।
गुरुदेव माझे उंच पुरे ।
त्रैलोक्य त्यांना पडे अपुरे ।। २ ।।
गुरुदेव माझे गोरेपान ।
शुभ्ररंग घाली खाली मान ।।
गुरुदेवांचे वस्त्र धवल ।
त्यांचे मन अन् कृती निर्मल ।। ३ ।।
गुरुदेव आहेत महान ।
त्यांना पाहून हरे देहभान ।।
गुरुदेव आमची माऊली ।
साधकांवर धरे कृपेची सावली ।। ४ ।।
गुरुदेव करतील हिंदु राष्ट्राचा घोष ।
सर्व देवांना होईल संतोष ।।
येईल रामराज्य जन होतील सुखी ।
रामनाम येईल प्रत्येकाच्या मुखी ।। ५ ।।
करूनी साधना आणि एकजूट ।
स्वभावदोष अन् अहं करू नष्ट ।।
गुरुदेवांची कृपा होईल सर्वांवर ।
रामराज्याचे होऊ साक्षीदार ।। ६ ।।
देवा एकच इच्छा असे मनी ।
न सुकणारे फुल होऊनी रहावे चरणांवरी ।।
गुरुदेवची करता करविता ।
गुरुदेवची माता पिता ।। ७ ।।
कृतज्ञता ! कृतज्ञता ! कृतज्ञता !!
‘गुरुदेवा, आपणच माझ्याकडून हे लिहून घेतलेत, त्याबद्दल कोटी कोटी कृतज्ञता !’
– आपल्याच चरणांची धूळ,
(पू.) श्रीमती माया गोखले (सनातन संस्थेच्या ८१ व्या संत, वय ७९ वर्षे), लांजा, रत्नागिरी. (२९.६.२०२४)