सकल राष्ट्रीय उत्पादन अल्प असतांना भारतातून निघत होता सोन्याचा धूर !
आपल्याला शिकवले गेले आहे की, ज्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन, म्हणजेच ‘जीडीपी’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अधिक असते, तो देश तितका समृद्ध असतो. जीडीपी म्हणजे काय ? तर ‘एका वर्षात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनाचे एकत्रित बाजार मूल्य.’ त्यावरून बाजार विकासाची गती लक्षात येते. यासाठी जीडीपीला अर्थव्यवस्थेचे सूचक म्हटले जाते. सर्व सरकारे आणि अर्थतज्ञ देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन वाढावे, यासाठी प्रयत्नरत आहेत. इतिहास सांगतो की, जेव्हा भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अल्प होते, तेव्हा भारतातून सोन्याचा धूर निघत होता. जेव्हापासून राष्ट्रीय उत्पादन वाढत आहे, तशी गरिबी वाढत आहे. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. त्याविषयी जरा विचार करा.
यावरून लक्षात आले असेल की, आजची अर्थव्यवस्था ही कॉर्पाेरेट आस्थापनांच्या समृद्धीचे सूचक आहे. महामारी पसरली, पुष्कळ औषधे विकली गेली, तर ‘जीडीपी’ वाढतो. स्वावलंबी व्यक्ती परावलंबी झाली, तर जीडीपी वाढत जातो. संयमी समाज व्यभिचारी झाला, तर जीडीपी वाढतो. गाय जीडीपी न्यून ठेवते, त्यासाठी कोणतेही सरकार गायींना वाचवण्यासाठी जातीने लक्ष घालील, असा विचार करणे, हा भ्रम आहे.
(साभार : विविध संकेतस्थळे)